सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनकडून जेलभरो…

2

सिंधुदुर्गनगरी येथे आंदोलन ;आशांना सेवेत कायम करण्याची केली मागणी…

ओरोस ता.०६:  सीआयटीयू झिंदाबाद..! आशा वर्कर्स यूनियनचा विजय असो..! आशांना सेवेत कायम करा..! आशा एकजुटीचा विजय असो आदी गगणभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स यूनियनच्यावतीने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर समोर महामार्गावर जेलभरो आंदोलन केले.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) चे राज्य उपाध्यक्ष कॉ. आबासो चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आज ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर समोर महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स यूनियनने जेलभरो आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्षा अर्चना धुरी, सचिव कॉ. विजयाराणी पाटिल, कॉ, नीलिमा लाड, तसेच जिल्ह्यातील 300 हून अधिक आशा कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

1

4