वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छतेमध्ये आणखी… एक पाऊल

2

स्वच्‍छ भारत अभियान अंतर्गत मिळाला ओडिफ++ दर्जा…

वेंगुर्ले.ता.६
वेंगुर्ला नगरपरिषदेने महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्वोत्कृष्‍ट नगरपरिषद २०१७, कोकण विभागातील उत्कृष्‍ट नगरपरिषद, वसुंधरा पुरस्‍कार मिळविलेली नगरपरिषद, स्‍वच्‍छ भारत अभियानात उत्‍कृष्‍ट कामगिरी केलेली नगरपरिषद म्‍हणून विविध पुरस्‍कार प्राप्‍त केलेले आहे. यावर्षी सन २०२० महाराष्‍ट्र स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने भाग घेतलेला असून यामध्‍ये ओडीफ+, ३ स्‍टार मानांकन, ओडिफ++, ५ स्‍टार मानांकन, स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२० अशा टप्‍पयामध्‍ये भाग घेतलेला आहे. यामध्‍ये वेंगुर्ला नगरपरिषदेला ओडीफ+, ३ स्‍टार मानांकन प्राप्‍त झालेले आहे. याच प्रमाणे आता वेंगुर्ला नगरपरिषदेला ओडीफ++ दर्जा हे हांगणदारीमुक्‍त शहर म्‍हणून प्राप्‍त झालेले आहे.
वेंगुर्ले मध्ये यासाठी १५ व १६ जानेवारी २०२० मध्‍ये ओडीफ++ तपासणी करणेसाठी शहरात विविध समित्‍या आल्‍या आणि त्‍यांनी शहरातील विविध भागात तसेच शहरातील शौचालयांची पाहणी केलेली आहे. यामध्‍ये शहरातील एकूण ९ सार्वजनिक शौचालयांची पाहणी करण्‍यात आली. यामध्‍ये शासनाने नेमून दिलेल्‍या निकषानुसार नगरपरिषदेने नागरीकांच्‍या सेवेसाठी सर्व आवश्‍यक बाबींची पुर्तता केलेली असल्‍याने वेंगुर्ला नगरपरिषदेस ओडिफ++ हा दर्जा प्राप्‍त झालेला आहे.
नगरपरिषदेचे यापुढे ध्‍येच ५ स्‍टार मानांकनाचे असून त्‍याचा सर्व्‍हे देखील शहरात झालेला आहे. या बाबत बोलताना नगराध्‍यक्ष दिलीप गिरप म्हणाले की, वेंगुर्ला नगरपरिषदेला ५ स्‍टार मानांकन प्राप्‍त होईल आणि स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२० मध्‍ये वेंगुर्ला नगरपरिषद भारतात अव्‍वल मानांकन प्राप्‍त करेल. सदरच्‍या कामी वेंगुर्ला शहरातील नागरीक, माझे सहकारी सर्व नगरसेवक, मा. मुख्‍याधिकारी , वेंगुर्ला नगरपरिषद, प्रशासन वर्ग व सर्व सफाई कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेले सर्व प्रयत्‍न आणि यशस्‍वी कामगिरी यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेने हा मानाचा सन्‍मान मिळविलेला आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी अशीच सहाकार्याची भावना ठेवून शहराच्‍या सर्वांगिण विकासामध्‍ये हातभार लावावा असे आवाहन नगराध्‍यक्ष श्री. दिलीप गिरप यांनी केलेले आहे.
दरम्यान मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी बोलताना सांगितले की, या दर्जामुळे हागणदारी मुक्त शहरांना मिळणारा प्रोत्साहन अनुदानाचा उर्वरित रू.४० लक्ष एवढा निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच अशा दर्जा मुळे काम करण्यासाठी आम्हाला सर्वाना नक्कीच आणखी प्रोत्साहन मिळेल.

4

4