जागतिक महिला दिनानिमित्त उद्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मतदार नोंदणी अर्जाचे वाटप…

2

शासकीय तंत्रनिकेतन येथे तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजन…

मालवण, ता. ६ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मालवण तहसील कार्यालयाच्यावतीने ७ मार्चला सकाळी दहा वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थीनींना मतदार नोंदणीसाठी अर्ज वाटप कार्यक्रम होणार आहे. यात तहसीलदार अजय पाटणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा यावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर १ जानेवारी २० रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थीनींना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी मतदार नोंदणीसाठी नमुना सहा अर्जाचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0

4