बँकेच्या कर्मचाऱ्याची दिरंगाई…. आणि एटीएम फोडल्याची अफवा…

2

बांदयातील घटना;चौकशीनंतर सर्वानी सोडला सुटकेचा निश्वास…

बांदा, ता.७: बांदा कट्टा कॉर्नर येथील बँक अॉफ इंडियाचे एटीएम फोडल्याच्या अफवेने आज शहरात एकच खळबळ उडाली. बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित एजन्सीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एटीएमचे लॉकर उघडे राहिल्याचे बँकेच्या कर्मचार्‍यांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले.                                    बँकेचे एटीएम अन्यत्र हस्तांतरीत झाल्याने एटीएम मधील रोकड काल संध्याकाळीच काढण्यात आली होती. एटीएम रोकड अभावी बंद असल्याची कोणतीही सुचना लावण्यात आली नव्हती. तसेच कॅश लॉकरही उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी येणार्‍या ग्राहकांमध्ये घबराट पसरली. साहजिकच एटीएम फोडल्याची अफवा शहरात वार्‍यासारखी पसरली. बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बँकेच्या कर्मचार्‍यांनी एटीएममध्ये रोकड नसल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित एजन्सीच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले.

2

4