मालवण, ता. ७ : रत्नागिरी येथे असेंट म्युझिक आणि जायंट्स वेल्फेयर फाउंडेशन आयोजित ‘हम भी तो हैं’ या हिंदी गीतगायन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत मालवणच्या सुनील परुळेकर यांनी बाजी मारली. या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
‘हम भी तो हैं’ या हिंदी गीतगायन स्पर्धा १५ ते ३५, ३६ ते ५५ आणि ५५ वर्षावरील अशा तीन वयोगटात घेण्यात आली. यात दुसऱ्या गटातून सुनील परुळेकर यांनी बहारदार गाणी सादर करत प्रथम क्रमांक पटकाविला. परुळेकर यांना ‘गोल्डन माईक’, प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. परुळेकर यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
हिंदी गीतगायनच्या महाअंतिम फेरीत सुनील परुळेकर यांची बाजी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES