कोरोनाची समस्या टाकून ठाकरे अयोध्येला…

2

नीतेश राणेंची टीका ः जिल्ह्यात रुग्ण आढळल्यास सरकार जबाबदार

कणकवली, ता. ७ : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असताना राज्याचे मुख्यमंत्री रामदर्शनासाठी अयोध्येला गेले आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी राज्य वार्‍यावर सोडलेय. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातही कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली नाही. शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केलेले नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याला सरकार जबाबदार असेल अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.
श्री.राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. देश विदेशातील पर्यटक सिंधुदुर्गात येतात. लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे हा व्हायरस सिंधुदुर्गात यायला वेळ लागणार नाही. मात्र शासकीय यंत्रणा या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झालेली नाही. सत्ताधार्‍यांनाही त्याचे गांभीर्य नाही. सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांनी कोरोना व्हायरस संदर्भात सर्व पक्षीय आढावा बैठक घेण्याची गरज होती. तसेच कोरोना व्हायरसचे संकट उद्भवल्यास पुरेसा औषध साठा, पुरेसे एन ९५ मास्क, हॅण्डवॉश आदींची सज्जता ठेवणे, नागरिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांसह सत्ताधारी लोकप्रतिनिधी देखील ढिम्म राहिले आहेत.

2

4