जागतिक महिला दिनानिमित्त महिला व पुरुषांसाठी रक्तदान शिबिर…

2

शिल्पा खोत यांची माहिती ; स्वराज्य सामाजिक संस्था, ढोल-ताशा पथकाच्या वतीने आयोजन…

मालवण, ता. ७ : स्वराज्य सामाजीक संस्था, स्वराज्य महिला ढोल ताशा पथक यांच्यावतीने व जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे सकाळी ८.३० वाजता महिला व पुरूषांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा शिल्पा खोत यांनी दिली.
घे भरारी रक्तदानासाठी एक पाऊल पुढे येऊन या अनोख्या सामाजीक उपक्रमात रक्तदान करून वाघिणींचा ठसा उमटविण्याची संधी महिलांना मिळणार आहे. जीवनदाता ग्रुप, अनेक रक्तदान ग्रुप, महिला ग्रुप, बचतगट यांच्यासह महिलांच्या अन्य ग्रुपनी रक्तदान करून जागतिक महिला दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमास माजी नगरसेविका स्नेहा नाईक, दर्शना कासवकर, सेजल परब, शीला गिरकर, डॉ. गार्गी ओरसकर, मनीषा पारकर, रणरागिणी अध्यक्षा नीलम शिंदे, प्रा. सुमेधा नाईक, वैशाली शंकरदास यांच्यासह चारूशिला आढाव, प्रतिभा चव्हाण, निकीता तोडणकर, सुवर्णा चव्हाण, सायली कांबळी, अश्‍विनी आचरेकर, शांती तोंडवळकर यांच्यासह अन्य सदस्यां उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त महिला, पुरूषांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज्य ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

5

4