महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील संघटना एकवटल्या…
कणकवली, ता.8 : महिलांची सुरक्षितता हेच आपले ध्येय’ हा संकल्प घेवून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सखी ग्रुप कणकवली,आम्ही कणकवलीकर अशा विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत शहरातून प्रबोधन रॅली काढली. यामध्ये राजकीय नेते,सामाजिक संस्था,संघटना,कॉलेज विद्यार्थी,पुरुष, महिला सहभागी झाले होते.
महिलांच्या सुरक्षेतच्या बाबतीत अनेक वर्षे फक्त चर्चा केली जातेय. मात्र काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.यामुळेच महिला दिनाचे औचित्य साधत महिला सुरक्षा रॅली मधून शहरात प्रबोधन करण्यात आले.
बाजरपेठ पटकीदेवी मंदीर येथून या रॅलीला सुरवात झाली.बाजरपेठ मार्गे ही रॅली पटवर्धन चौकात आली असता महिला सुरक्षाहिताची शपथ देण्यात आली.या रॅली मध्ये महिला सोबत पुरुष ही सहभागी झाल्यामुळे महिला पुरुष एकतेचे दर्शन पहावयास मिळाले.
पुढे ही रॅली पटवर्धन चौक,पोलीस स्टेशन रोड,पिंपळपार कलमठ ते पोलीस स्टेशन कणकवली येथे या रॅलीची सांगता झाली.