दोघे अटकेत;दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या सहका-याचा समावेश…
मुंबई.ता,०८: नवी मुंबई येथील एका फॅक्टरीवर धाड टाकून पोलिसांनी तब्बल सहा कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे.आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे या प्रकरणात एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या सहकाऱ्याचा समावेश आहे.गेले काही दिवस पोलिसांना त्या परिसरात असलेल्या जुना फॅक्टरी काही काळेबेरे चालल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तब्बल सहा कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे.यात मोठे रॅकेट असल्याचा संशय मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.