निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन…

2

युवा नेते विशाल परबांचा पुढाकार; शेतकरी,विद्यार्थ्यांचा होणार सन्मान…

कुडाळ ता.०८: भाजपाचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे कट्टर समर्थक तथा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री राणे यांचा वाढदिवस १५ मार्चला होत आहे.यानिमित्त माणगाव-तिठा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शाळकरी मुलांना,महिलांना, शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात सकाळी नऊ वाजता जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा, दुपारी दोन वाजता महाराष्ट्र व गोवा राज्यातील शेतकऱ्यांकरिता सुदृढ बैल स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता श्री राणे यांचा वाढदिवस सोहळा व त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.यावेळी गोवन रोंबाट हे या कार्यक्रमात विशेष आकर्षण असणार आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आव्हान श्री.परब यांनी केले आहे.

0

4