सिंधुदुर्ग राष्ट्रवादीकडुन महिला पदाधिकाऱ्यांना “इलेक्ट्रिक बाईक” भेट…

2

आठही तालुक्यात वितरण;संघटनावाढीसाठी अविनाश चमणकरांचा पुढाकार

वेंगुर्ला.ता,०८: जिल्ह्यातील राष्ट्रवादी बळकट करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आठही तालुक्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक बाईक देण्यात येणार आहे.याची सुरुवात आज वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात करण्यात आली यावेळी तुळस येथील संपदा तुळसकर या युवतीला ही गाडी भेट देण्यात आली.आता भविष्यात अन्य आठही तालुक्यात या गाड्या वितरित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पक्ष संघटना वाढीवर चर्चा करण्यात आली.तसेच सदस्य नोंदणी करण्यात आली.यावी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात झाला. यासाठी आवश्यक असलेले सर्व झालेले प्रांतिक सदस्य अविनाश चमणकर यांनी केले आहे.

जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष प्रा सचिन पाटकर प्रांतिक सदस्य एम के गावडे सावंतवाडी विधानसभा पक्ष निरीक्षक अर्चना ताई घारे सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष रेवती राणे नांदुरा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष प्रसाद चमणकर प्रांतिक सदस्य अविनाश चमणकर माजी राज्यमंत्री ज्येष्ठ नेते प्रवीण भाई भोसले श्री मकरंद परब मालंडकर वेंगुरला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ लींगवत ज्येष्ठ नेते सावळाराम अणावकर जिल्हा चिटणीस  धर्माजी बागकर आदी उपस्थित होते.

 

4

4