Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला अटक...

दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला अटक…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; १३ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.०८: गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने चोरट्या दारूची वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क खात्याने पथकाने कारवाई करत ८ लाख ७१ हजार ४४० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक शंकर ठुंबरे (रा. वैश्यवाडा-सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुलि तपासणी नाक्याचे निरीक्षक एस. एच. चव्हाण यांना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार चव्हाण यांनी सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, रमेश चांदुरे, संदीप कदम यांनी झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुलि-कोठावळेबांध येथे सापळा रचला होता. रात्री उशिरा गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच ०७ एजे ०४५१) तपासणीसाठी थांबविण्यात आला. टेम्पोच्या पाठीमागील होद्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे बेकायदा १३५ खोके आढळले. ८ लाख ७१ हजार ४४० रुपये किमतीची दारू व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काळोखाचा फायदा घेऊन चालकाचा साथीदार फरार झाला.
अधिक तपास निरीक्षक एस. एच. चव्हाण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments