वेंगुर्ला रोटरी क्लब कडून महिला पोलीसांना माक्स व कीटचे वाटप…

2

वेंगुर्ले.ता,०८: 
जागतिक महिला दिनानिमित्त, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊन पुरस्कृत रोटरॅक्ट होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्यावतीने वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील महिला पोलीसाना फर्स्ट एड ट्रॅव्हलर किट व मास्क प्रदान करण्यात आले.
रोटरॅक्ट होमिओपॅथी मेडिकल कॉलेज क्लब प्रेसिडेंट स्वप्निल परब, सेक्रेटरी श्रुतिका शेडगे, व्हाईस प्रेसिडेंट निहाल नाईक, ट्रेझरर स्नेहल भोईर, क्लब सर्व्हीस डायरेक्टर हरीता थोरात यानी १५ फर्स्ट एड ट्रॅव्हलर किट व मास्क वेंगुर्ला पोलीस उपनिरिक्षक रूपाली गोरड व महिला पोलीस याना प्रदान केले. या कार्यक्रमाला वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यावेळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अच्युत परब, वेंगुर्ला रोटरी क्लब प्रेसिडेंट राजेश घाटवळ, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, आनंद बांदेकर मान्यवर उपस्थित होते.

2

4