गोव्यात जाणाऱ्यांना खास सावंतवाडी पणजी एसटी बस…

2

मोहनदास खराडे; प्रायोगिक तत्वावर राबवणार दर सोमवारी फेरी….

सावंतवाडी,ता.०९:  गोव्यात शिक्षण-व्यवसायासाठी जाणा-यांच्या सोईसाठी दर सोमवारी,सकाळी पावणे सहा वाजता सावंतवाडीतून प्रायोगिक तत्त्वावर एस.टी बस सोडण्यात येणार आहे,अशी माहिती सावंतवाडी आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे यांनी आज येथे दिली.
गोव्यात वैद्यकीय, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट सह विविध पदवी, पदविका अभ्यासक्रम शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी सावंतवाडी शहर व परिसरातून दर सोमवारी जात असतात, याशिवाय गोव्याच्या विविध भागात, येथील शेकडो लोक, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करीत असतात, तेथे त्यांना वेळेत पोहचण्यासाठी, सावंतवाडीतून जाणा-या खासगी गोवा बसेसचा आधार घ्यावा लागतो, मात्र अलिकडे या खासगी बसेस झाराप-पत्रादेवी हाय-वे वरुन परस्पर जात असल्याने, सावंतवाडी, माजगाव भागात वाट पहात ताटकळत थांबलेल्या प्रवाशांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी, सावंतवाडीतून या वेळेत हमखास सुटणा-या व वेळेत पणजी-गोवा येथे पोहचणा-या जलद बसची मागणी गेले काही दिवस सातत्याने होत होती. तिची दखल घेऊन दर सोमवारी सकाळी पावणे सहा वाजता सावंतवाडी बस स्थानकावरुन पत्रादेवी मार्गे गोव्याला जाणारी एक बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकानी घेतला आहे. ही बस माजगांव, बांदा, म्हापसा आणि पणजी असे मर्यादित थांबे घेणार असल्याचेही श्री खराडे यांनी स्पष्ट केले.

5

4