अण्णा महाराजांचा १३ मार्चला अमृत महोत्सवी वाढदिवस…

2

११ ते १४ पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन;उपस्थित राहण्याचे भक्तगणांकडुन आवाहन…

कुडाळ,ता.०९: पिंगुळी येथील परमपूज्य सद्गुरू विनायक उर्फ अण्णा महाराज यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस १३ मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने बाबांच्या मठात ११ ते१४ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धार्मिक सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमचा समावेश आहे.
त्यानिमित्ताने ११ मार्च ते १४ मार्च! या कालावधीत धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्यविषयक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ११ मार्च रोजी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सकाळी सात वाजता परमपूज्य राऊळ महाराज समाधी पूजन अभिषेक, आठ वाजता शांती धार्मिक विधी देवता जप, बारा वाजता आरती व्यवस्था सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी सात वाजता आरती,नऊ वाजता आर्ट इन मोशन सादर करते श्रद्धा नेरुरकर. दि.१२ मार्च रोजी सकाळी सात वाजता समाधि पूजन अभिषेक, आठ वाजता शांतीपाठ, नऊ वाजता राऊळ महाराज पालखी उत्सव मूर्ती विनायक अण्णा महाराज सपत्नीक रथ मिरवणूक सोहळा महाराज भक्त मंडळ आजरा यांची पायी दिंडी आगमन, बारा वाजता आरती, एक वाजता महाप्रसाद,भजन, ८:३० वाजता एक अंकी नाटक अनाथांचे नाथ पिंपळीचे श्री राऊळ नाथ, रात्री बारा वाजता भाविकांच्या उपस्थितीत विनायक अण्णा राऊळ महाराजांचा ७५ वा अमृत महोत्सव वाढदिवस ढोल-ताशांच्या गजरात संपन्न होणार आहे.
१३ आणि १४ तारखेला भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्यात भजन-कीर्तन,भक्तीगीत, दिंड्या आणि दिनकर मिस्त्री यांचा शिमगोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट यांनी केले आहे.

5

4