कब -बुलबुल जिल्हा मेळाव्यात जि.प. उभादांडा नवाबाग शाळेचे सुयश…

2

वेंगुर्ले,ता.१०:  श्री.रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव ता.मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात जि.प.शाळा उभादांडा नवाबाग ता.वेंगुर्ला शाळेला भरघोस असे यश मिळाले.
जंगी आरोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक,शेकोटी कार्यक्रमात त्रुतीय क्रमांक व खरी कमाई उपक्रमातही ३रा क्रमांक प्राप्त झाला.या मेळाव्यात स्काऊट झेंडावंदन,मातकाम,कबग्रीटींग,बडीसलामी,शोभायात्रा,शेकोटी कार्यक्रम, सर्वधर्मीय प्रार्थना, स्वच्छता इ.विविधरंगी कार्यक्रम घेण्यात आले. मुलांनी अगदी समरसतेने सर्व कार्यक्रमाचा आनंद लूटला.सर्व कार्यक्रमासाठी मुलांना मुख्याध्यापिका सौ.तन्वी रेडकर, कब मास्तर श्री.रामा पोळजी, शिक्षक श्री.मारुती गुडूळकर, श्रीम.प्राजक्ता आपटे, शाळा व्य.स.अध्यक्ष श्री.दादा केळूसकर, उपाध्यक्ष श्री.दत्ताराम कोळंबकर, सदस्या जान्हवी मोर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.
या मेळाव्याला प्रा.शिक्षणाधिकारी श्री.आंबोकर, जि.प.अध्यक्षा समिधा नाईक, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, स्काऊट-गाईड जिल्हा आयुक्त आर.बी.दळवी, अन्वर खान, संस्था चिटणीस स्नेहलता राणे, जिल्हा संघटक अंजली माहूरे, तळगाव सरपंच अनघा वेंगुर्लेकर, तळगाव हायस्कूल मुख्या.प्रदीप शिंदे,श्री.प्रकाश दळवी इ.अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे अभिनंदन व कौतुक केले.

2

4