तुळस येथील “क्युट कपल २०२०’ स्पर्धेत वाडोकर दांपत्य विजेता…

2

श्री देवी सातेरी महिला मंडळाचे योजन; मराठे दांपत्य उपविजेते…

वेंगुर्ले ता,१०: तुळस येथील श्री देवी सातेरी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘क्युट कपल २०२०” स्पर्धेत कुडाळ येथील अस्मिता अतुल वाडोकर व पुरुषोत्तम वाडोकर यांनी विजेतेपद पटकाविले.दरम्यान या स्पर्धेत एकूण १४ स्पर्धक जोड्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा शुभारंभ जिजाऊ महिला भवनाच्या अध्यक्षा नीलम राणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी सभापती अनुश्री कांबळी,जि.प.माझी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते,ज्येष्ठ मार्गदर्शक सुवर्णा झांट्ये, जी.पमाजी सदस्यायोगिता परब,नगराध्यक्ष दिलीप गिरप,नगरसेवक सुहास गवंडळकर,नगरसेविका शीतल आंगचेकर,मनीष दळवी,नितीन चव्हाण, प्रथमेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला मंडळ अध्यक्षा सुजाता पडवळ, उपाध्यक्ष रत्नमाला तुळसकर, सचिव श्रद्धा गोरे,भाग्यलक्ष्मी घारे, भावना परब तसेच मंडळाच्या अन्य महिला सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.
या स्पर्धेच्या उपविजेत्या सावंतवाडी-मळेवाड येथील धनश्री मराठे व हेमंत मराठे दांपत्य.तर तृतीय विजेत्या तुळस येथील पूनम परब व ओंकार परब दांपत्य ठरले. या स्पर्धेत बेस्ट स्माईल श्री.व सौ.अपर्णा सुधीर तातोडे,बेस्ट कॅटवॉक श्री. व सौ.विधिता प्रकाश मालवणकर,बेस्ट पोशाख श्री.व सौ.लक्ष्मी नारायण परब,बेस्ट हेअरस्टाईल श्री.व सौ.अश्विनी अरुण मांजरेकर तर बेस्ट फोटोजनिक श्री.व सौ.गायत्री आदित्य मेढेकर,स्पर्धेचे परीक्षण नाट्य कलाकार संजीव पुनाळेकर, गोवा येथील सिद्धी प्रभू,निलोफर नाईक यांनी केले.तर स्पर्धेचे सूत्रसंचालन शुभम धुरी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळेकर यांनी केले.

23

4