२१ मार्चला नवी मुंबईत निवड फेरी; दोन लाखांची बक्षीस…
बांदा, ता.१०: स्पंदन एंटरटेनमेंट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने मिस अँड मिसेस इनेट ब्युटी २०२० या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन लाख रुपये किमतींची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेची निवड फेरी शनिवार दिनांक २१ मार्च रोजी नवी मुंबई येथे होणार आहे. स्पंदन एन्टरटेनमेंट ही इव्हेंट मँनेजमेंट कंपनी आपल्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असून बांदा गावचे सुपुत्र सिद्घेश महाजन हे या संस्थेचे संस्थापक आहेत. स्पंदनतर्फे आयोजित मिस कोकण हा कार्यक्रम सिंधुदुर्गातील बांदा तसेच कुडाळ येथे आपल्या यशस्वी आयोजनासाठी कौतुकास्पद ठरला होता.
या मिस अँड मिसेस इनेट ब्युटी स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रवेश शुल्क नाही. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे.निवड फेरी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होईल. कलाकार डॉ. महेंद्रकुमार पाध्ये, मॉडेल तथा अभिनेत्री मयुरी शुभानंद, मयुरी लोंढे, अभिनेता सारंग जगताप हे निवड समिती सदस्य आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राहुल महाडिक हे या शोचे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत.
या सोहऴ्याला प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील, अभिनेता संकेत मोरे हे सेलिब्रिटी प्रमुख पाहुणे आहेत. तसेच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर जयवंत दत्तात्रय, नवीमुंबई परिवहन विभागाचे माजी सभापती रामचंद्र दळवी, विरोधी पक्ष नेता विजय चौगुले, शिवसेना नेते विजय नाहटा, नगरसेविका मृणाल पेंडसे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा निवड फेरीचा कार्यक्रम प्रणाम बँक्विट, पहिला मजला, साई संगम बिल्डिंग, सिबीडी बेलापूर येथे होणार आहे. त्यानंतर निवडलेल्या स्पर्धकांच्या पुन्हा चार वेळा निवड फेऱ्या होतील. अंतिम सोहळा सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे होणार आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 8657764626 /8657764627 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्पंदन एन्टरटेनमेंटच्या वतीने करण्यात आले आहे.