Tuesday, May 20, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"शिवसेना स्टाईल" धमकी देणाऱ्या रूपेश राऊळांना पुरून उरू...

“शिवसेना स्टाईल” धमकी देणाऱ्या रूपेश राऊळांना पुरून उरू…

भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा; सावंतवाडी आठवडा बाजार प्रश्न आणखिन चिघळण्याची शक्यता…

सावंतवाडी.ता,११: शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आठवडा बाजार प्रश्न शिवसेना स्टाईलची धमकी देऊ नये,आम्ही सावंतवाडीकर म्हणून त्यांना पुरून उरू,आठवडा बाजार जिमखाना मैदानावर नेल्यानंतर लोकात समाधान आहे,त्यामुळे त्यांनी नाहक या प्रश्नाचे राजकारण करू नये,असा सल्ला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निशांत तोरसकर यांनी आज येथे दिला.लोकांची व व्यापा-यांची मागणी असेल,तर आजही आम्ही विचार करण्यास तयार आहोत,परंतु अशा प्रकारे कोणतीही मागणी अद्याप पर्यंत आलेली नाही,त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने याठिकाणी येऊन सावंतवाडीतील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये,असा टोलाही यावीळी श्री.तोरसकर यांनी राऊळ यांना लगावला.यावेळी तोरसकर पुढे म्हणाले याठिकाणी स्थानिक लोकांची विरोधी भूमिका असल्यामुळे उभा बाजार परिसरात असलेला आठवडा बाजार जिमखाना मैदान नेण्यात आला, त्याबाबत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्षांनी कल्पना दिली होती, त्यानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करणे अपेक्षित होते, मात्र तसे न करता दुकाने बंद ठेवून नगराध्यक्षांचा निषेध करण्यात आला हा सर्व प्रकार चुकीचा आहे, लम अशाप्रकारे थेट निषेधाची भूमिका घेण्यापेक्षा संबंधितांनी चर्चेला येणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही दुसरीकडे हा बाजार जिमखाना मैदानात भरवण्यात आल्यामुळे ग्राहक व्यापारी व मुख्य करून हॉकर्स संघटनेचे सदस्य सकारात्मक झाल्यामुळे त्यांचा या प्रक्रियेला विरोध असेल असे वाटत नाही.
तोरसकर पुढे म्हणाले आठवडा बाजार उभा बाजार परिसरात असताना त्याठिकाणी छेडछाडीचे प्रकार चोरीचे प्रकार होतील ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, मात्र सर्व लोक सकारात्मक असताना गावातून आलेले रुपेश राऊळ यांनी या ठिकाणी शिवसेना स्टाईल दाखवण्याची भाषा केली आहे. हा सर्व प्रकार म्हणजे हास्यास्पद आहे. त्यांनी शिवसेना स्टाईल करून दाखवावे, त्यांची धमकी आम्ही त्यांच्याात घशात घालू असा इशारा यावेळी तोरसकर यांनी दिला आहे.
यावेळी प्रसाद अरविंदेकर, अजय गोंदावले,अमित परब,गुरू मठकर,दीनानाथ नाईक,केतन आजगावकर, परिणीता वर्तक, शैलेश तावडे, महेश पांचाळ, गोविंद साटेलकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments