राज्यात विकले जाणारे चिकन-मटण सुरक्षित…
सिंधुदुर्गनगरी.ता,११: सध्या समाज माध्यमांवर चिकन व मटण खाण्यामुळे कोरना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा चुकीचा संदेश प्रसारित होत आहे. याबाबत खातरजमा करण्यासाठी केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण,नवी दिल्ली यांनी समिती स्थापन केली होती.या समितीने कोरोना विषाणूचा संसर्ग हा मनुष्याकडून मनुष्याकडे होत असल्याचे व आपल्या देशात व राज्यात विकले जाणारे चिकन व मटण हे खाण्यास सुरक्षित असल्याचे घोषीत केले आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यात विकले जाणारे चिकन व मटण हे खाण्यास सुरक्षित आहे. मटण व चिकन तयार करताना योग्य नियमित स्वच्छता बाळगावी, स्वच्छ हातानी व स्वच्छ भांडी वापरून स्वच्छ वातावरणामध्ये तयार करावे, सोशल मिडियामध्ये येणाऱ्या चुकीच्या संदेशांना बळीपडू नये व असे संदेश पसरविणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनास देऊन सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.