Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"कोरोना" च्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरीकांना शहरात प्रवेश देऊ नये...

“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरीकांना शहरात प्रवेश देऊ नये…

वेंगुर्लेत शिवसेनेच्यावतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन…

वेंगुर्ला,ता.१८:‘कोरोना‘ या महाभयंकर रोगाच्या साथीपासून वेंगुर्ला शहरवासीयांना वाचवण्यासाठी, त्वरित बाहेरून येणारे परदेशी नागरिक, व्यवसायानिमित्त येणारे व्यावसायिक यांची कसून तपासणी करून अशा व्यक्तींना वेंगुर्ला शहरात प्रवेश करु देऊ नये या संदर्भात वेंगुर्ला शहर शिवसेनेच्यावतीने वेंगुर्ला पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या जगभरात व महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोना या रोगाच्या महाभयंकर साथीचा सतत वाढणारा प्रसार यामुळे सर्वत्र लोक भयभीत झाले आहेत. या महाभयंकर कोरोना रोगाच्या विषाणूपासून आपल्या वेंगुर्ला शहराला वाचवण्यासाठी त्वरित आपल्या कार्यालयामार्फत बाहेरून वेंगुर्ला शहरात व तालुक्यात येणारे परदेशी नागरिक, पर्यटक छोटे- मोठे व्यवसाय निमित्त येणारे व्यावसायिक, नेपाळी कामगार यांचा गांभीर्याने शोध घेऊन व कसून चौकशी करून अशा व्यक्तींची त्वरित आरोग्य तपासणी करून त्यांना शहराबाहेर पाठवून यापुढे अशा व्यक्तींना वेंगुर्ला शहरात प्रवेश देऊ नये. यासाठी कडक उपाययोजना करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, आबा कोंडसकर, सचिन वालावलकर, हेमंत मलबारी, संदीप केळजी, पंकज शिरसाट, मंजुषा आरोलकर, निरवडेकर, वृंदा मोर्डेकर, सुधाकर गावकर, सुनिल डुबळे, बाळा दळवी, आनंद बटा, बागायतकर, सुयोग चेंदवणकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments