कणकवली तालुक्यात एकही कोरोना संशयित नाही…

2

प्रांताधिकार्‍यांची माहिती: विदेशातून आलेल्या नागरिकांवर घरीच उपचार…

कणकवली, ता.१८: कणकवली तालुक्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना संशयित रुग्ण आढळलेला नाही. तर विदेशातून आलेल्या 12 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आज येथे दिली.
येथील तहसील कार्यालयात कणकवली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी घेतली. यात त्यांनी कोरोना प्रादुर्भाव बाबतचा आढावा घेतला. त्यानंतर तालुक्यात एकही कोरोना संशयित आढळलेला नसल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला तहसीलदार आर.जे.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तालुक्यात अद्याप एकही कोरोना संशयित आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, तापसरीच्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. तसेच संशयास्पद रुग्ण आढळल्यास नागरिकांनी त्याबाबतची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखावी असेही आवाहन प्रांताधिकार्‍यांनी केले.

4

4