मणिपाल हॉस्पिटलचे रक्त तपासणी केंद्र पुन्हा सुरू करा…

2

माकड तापाच्या पार्श्वभूमीवर मनसेची आरोग्य विभागाकडे मागणी…

बांदा,ता.१८: सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात माकड तापाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आले. मणिपाल हॉस्पिटलचे रक्त तपासणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे,अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
याबाबत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य प्रशासनाने तात्काळ योग्य ती सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यावर त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे.आज माकड तापाने बांदा पंचक्रोशीतील दुसरा बळी घेतला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी असणारे के डी एफ विभाग शासनाने बंद केल्यामुळे माकड तापाच्या रुग्णांची तपासणी सदर या भागातील रुग्णांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी रक्त तपासणी साठी नमुने द्यावे लागतात. त्यानंतर तीन दिवसांनी त्याच्या रक्ताचा अहवाल येतो. त्यामुळे रुग्णाला पाहिजे तसा उपचार डॉक्टरांना करता येत नाही. त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे असणारा केडीएमटी विभाग मणिपाल पुन्हा सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केले आहे.

 

4

4