Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोना व्हायरस मुळे रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद...

कोरोना व्हायरस मुळे रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद…

वेंगुर्ला,ता.१८: तालुक्यातील रेडी नागोळेवाडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिर कोरोना साथीच्या च्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त विनायक कांबळी यांनी दिली.
कोरोना साथीने सर्वत्र थैमान घातल्या नंतर सदर साथीचा प्रसार खंडित करण्यासाठी जमावबंदी आदेश राज्यात लागू केल्या नंतर गर्दी कमी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिर आज दुपार पासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. या मंदिरात गोवा, बेळगाव, कोल्हापूर येथून भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच जिल्यातील भाविकांचीही या मंदिरात नेहमीच वर्दळ असते. संकष्टी चतुर्थी किंवा इतर उत्सवानाही या मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने हे गणपती मंदिर ३१ मार्च पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments