Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामामाला घातला भाच्यांनी १० लाखाचा गंडा...

मामाला घातला भाच्यांनी १० लाखाचा गंडा…

तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा : घर विक्रीचा बहाणा

कणकवली, ता.१८: बारा लाख रुपयांत घर घेऊन देतो असे सांगून मामाला 10 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार आज उघड झाला. याप्रकरणी मनोहर हरी गावकर (वय 59) यांनी आपला भाचा राकेश आणि राजेश गणपत वायंगणकर (रा.डोंबिवली) यांच्यासह देसाई नामक व्यक्ती विरोधात येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे ः मूळ मिठमुंबरी पण मुंबईत राहणारे मनोहर गावकर यांना गावात घर घ्यायचे होते. त्याअनुषंगाने त्यांचे भाचे राकेश आणि राजेश गणपत वायंगणकर यांनी देसाई नामक व्यक्तीला घेऊन मुंबई गाठली. तेथील एका हॉटेलमध्ये 21 नोव्हेंबर 2019 रोजी चर्चा झाली. यात कणकवली तालुक्यातील आशिये येथील एक घर आणि जागा यांचा एकत्रित 12 लाख रुपयांचा व्यवहार पक्का झाला. त्यानंतर 4 डिसेंबर 2019 रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये श्री.गावकर यांनी आपला भाचा राकेश याला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर मिठबाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये राकेश याच्या नावे पाच लाख रुपये जमा केले.
दहा लाख रुपये दिल्यानंतरही घर खरेदीचा व्यवहार झाला नाही म्हणून श्री.गावकर यांनी आशिये गावात येऊन चौकशी केली. यावेळी तेथे देसाई यांचे घर नसल्याचे लक्षात आले, त्यामुळे आपल्या भाच्यांनीच आपल्याला फसवल्याचे श्री.गावकर यांच्या लक्षात आले. यानंतर गावकर यांनी आपल्या भाच्यांकडे पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी ते दिले नसल्याने दोन भाच्यांसह देसाई नामक व्यक्ती विरोधात आज फसवणुकीची तक्रार दाखल केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments