आंगणेवाडीतील भराडी मातेचे दर्शन उद्यापासून बंद…

2

भाविकांनी दर्शनास न येण्याचे आंगणे कुटुंबीयांचे आवाहन ; कोरोना महामारीपासून सर्वांचे रक्षण करण्याचे देवीला साकडे…

मालवण, ता. १८ : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेडीतील गणपती मंदिरा पाठोपाठ मसुरे- आंगणेवाडीतील भराडी मातेचे दर्शनही उद्यापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, आंगणे कुटुंबीयांनी दिली.
कोरोना हा महामारी आजार असून यापासून सर्वसामान्यांचे रक्षण कर असे साकडे आज आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळाने भराडी मातेस घातले. उद्यापासून भाविकांसाठी देवीचे दर्शन पुढील निर्णय होईपर्यंत बंद राहील. त्यामुळे भाविकांनी आंगणेवाडीत भराडी मातेच्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहनही आंगणे कुटुंबीयांनी केले आहे.

24

4