Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअधिकारी कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन...

अधिकारी कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी,ता.१९: राज्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने वेळीच खबरदारीचे उपाय केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. त्यापार्श्वभूमिवर उप प्रादेशिक परिवहन कार्यावयामध्ये पुढील प्रतिबंधात्मक उपायययोजना करण्यात येत आहेत. शिकाऊ अनुज्ञप्ती अर्थात लर्निंग लायसन्ससाठीचा दैनंदिन कोटा दिनांक ३१ मार्च २०२० रोजी पर्यंत कमी करण्यात आला आहे. दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत शाकऊ अनुज्ञाप्तीसाठी घेतलेल्या अर्जदारांचे अपाँईमेंट पुढील महिन्यामध्ये रिशेड्युल करण्यात येतील, व ज्या अर्जादारांच्या लर्निंग लायसेन्सची मुदत ३१ मार्च २०२० रोजी पर्यंत संपणार आहे त्यांची पक्क्या लायसन्ससाठीची चाचणी घेण्यात येईल. इतर सर्व पक्क्या लायसन्ससाठीची चाचणी पुढील महिन्यात घेण्यात येतील. एका वेळेस फक्त एकाचीच लर्निंग लायसन्सची चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी मौखिक स्वरुपाची असेल, संगणकावर चाचणी घेण्यात येणार नाही. दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत कार्यालयामध्ये फक्त लायसन्स नुतनीकरण, वाहनांची पुनःनोंदणी, योग्यता प्रमाणपत्रांचे नुतनीकरण, परवाना संबंधी कामेच करण्यात येतील. नवीन नोंदणीची सर्व कामे सुरू राहतील. सर्व कॅम्प कार्यालय दिनांक ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत बंद करण्यात येत आहेत. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, पक्के लायसन चाचणी ही सर्व कामे मोटार वाहन निरीक्षक यांनी ग्लोऊज व मास्क घालून करावीत, कार्यालयामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी असे आवाहन प्रसाद दळवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments