तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आवरा….

2

मनसेची मागणी; अन्यथा मनसैनिक रात्रीच्यावेळी गाड्या पकडतील…

सावंतवाडी,ता.१९: तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्गावरून होणाऱ्या अवैद्य वाळू वाहतुकीला आळा घाला, अशी मागणी आज मनसेच्या वतीने येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली. याबाबत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, ओंकार कुडतरकर आदी उपस्थित होते. यावेळी तहसिलदारांना मनसेकडून निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे .यामध्ये काही तरी काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होणारी बेकायदा वाहतूक लक्षात घेता, ती तात्काळ रोखण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील लोकांना रास्त दरात वाळू मिळावी. तुम्ही करा, अन्यथा आम्ही रात्रीच्या वेळी बिनदिक्कतपणे सुरू असलेली वाळू तसेच संशयास्पद डंपर मनसैनिक पकडतील,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

2

4