Friday, December 5, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "म्युझिक कॉर्नर" चा सामाजिक उपक्रम...

सावंतवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “म्युझिक कॉर्नर” चा सामाजिक उपक्रम…

कोणत्याही खरेदीवर हँड सॅनी टायझर आणि मास्क मोफत देण्याची सुविधा…

सावंतवाडी ता.१९: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येथील “म्युझिक कॉर्नर अँड मोबाईल शॉपी” यांच्या वतीने अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.यात त्यांनी ग्राहकांसाठी कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर हॅन्ड सॅनीटायझर आणि मास्क मोफत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.दरम्यान या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनीं केले आहे.
कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव आणि त्यापासून आपल्या ग्राहकांचे संरक्षण व्हावे,या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे या उपक्रमाचे काही ग्राहकांकडून कौतुक सुद्धा होत आहे.तर अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments