वेंगुर्ला शहरात सहा ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर….

2

कोरोना : उपाययोजना म्हणून नगरपरिषदेचा पुढाकार

वेंगुर्ले.ता.१९: कोरोना व्हायरस पासून नागरीकांचे संरक्षण होण्यासाठी वारंवार हात साबणाने किवा हॅण्डवॉशने स्वच्छ करणे आवश्यक बनले आहे. ही सुविधा नागरीकांना सहज उपलब्ध व्हावीत यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने शहरात सहा ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारण्यात आली आहेत.
शहरातील एस.टी.स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठ, पूर्वसमंदिर, कॅम्प कॉर्नर, हॉस्पिटल नाका या भागात हॅण्डवॉश सेंटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष श्री. गिरप यांनी केले आहे.

4

4