खून केल्याप्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला…

2

ओरोस,ता.19:आंबोली जकातनाका येथे ट्रक चालकाचा खून करून 25 टन साखरेची चोरी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अवधूत शंकर कालेकर (25) रा. कसबा सांगाव कागल कोल्हापूर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी फेटाळुन लावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.

1

4