Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याडाक कर्मचाऱ्यांसाठी २० रोजी पेन्शन अदालत...

डाक कर्मचाऱ्यांसाठी २० रोजी पेन्शन अदालत…

सिंधुदुर्गनगरी,ता.१९: सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे निवारणासाठी डाक विभागातर्फे शुक्रवार दिनांक २० मार्च २०२० रोजी अधिक्षक डाक घर, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ११ वा. पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, ज्यांच्या पेन्शन केसचा ३ महिन्यात निपटारा झालेला नाही अशा प्रकरणांना या पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे. तसेच नितीगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी, निती प्रकरणांचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतन धारकांनी डाक कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज डाक घर कार्यालयामध्ये सादर करावेत असे डाक घर अधिक्षक हे कळवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments