सिंधुदुर्गनगरी येथील आठवडी बाजार ३१ पर्यंत बंद…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.१९: शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यत साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ तील खंड २,३ व ४ मधीलव तरतुदीनुसार अधिसूचना जारी केली आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही या विषयी सूचना देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात दर रविवारी आठवडा बाजार भविण्यात येतो. या आठवडी बाजारात मोठ्या संख्येने गर्दी होत असते. याचा विचार करता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथे भरविण्यात येणारा आठवडी बाजार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव तथा अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी हे कळवितात.

3

4