सिंधुदुर्गनगरी,ता.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे दिनांक २० मार्च २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक २० मार्च २०२० रोजी सकाळी ९:१५ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस येथे आगमन मोटारीने जिल्हा शासकीय रूग्णालयाकडे प्रयाण, सकाळी ९:३० वाजता जिल्हा शासकीय रूग्णालय सिंधुदुर्ग येथे भेट व पाहणी, सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय रूग्णालय येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयकडे प्रयाण, सकाळी १०:१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जागृती संदर्भात आढावा बैठक, सकाळी ११:१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सकाळी ११:४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड ओरोसकडे प्रयाण, दुपारी १२ वाजता पोलीस परेड ग्राऊंड ओरोस येथून खाजगी हेलिकॉप्टरने पाली, रत्नागिरीकडे प्रयाण.
पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES