Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजागतिक वन दिनानिमित्त २१ मार्चला वृक्ष लागवडीचे आवाहन...

जागतिक वन दिनानिमित्त २१ मार्चला वृक्ष लागवडीचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी.ता,२० : २१ मार्च या जागतिक वन दिन साजरा करण्यात येत असून महाराष्ट्र राज्यात वनाखालील 33 टक्के क्षेत्र आणण्यासाठी एक मुल व एक झाड ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांनी केले आहे.
वाढत्या आधुनिकीकरणासाठी कारखाने व मोठ्या प्रमाणात शेतीचे अधुनिकीकरण यामुळे जंगल व खासगी क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्षांची तोड होत आहे. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरीजल अतिप्रदुषणामुळे ओझोन थर कमी होऊन त्याचा पृथ्वीवर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. वृक्षांचे प्रमाण कमी झाल्यामुळे सहाजिकच उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. समाजातील सर्व लोकांनी याकडे गांर्भीयपूर्वक लक्ष देवून जास्तीत जास्त झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, सर्व नागरिक यांनी 1 जुलै ते 30 जुलै या दरम्यान जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावे. तसेच हरितसेना योजनेमार्फत शाळा, कॉलेज येथेही वृक्ष लागवड करण्यात यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.।

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments