गोवा-सिंधुदुर्ग सीमेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत सुरु…

2

सावंतवाडी ता.२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
गोवा-सिंधुदुर्ग सीमा सील करण्यात आलेली नाही.अशा प्रकारचे कोणतेही आदेश अद्याप पर्यंत वरिष्ठांकडून प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे,अशी माहिती सातार्डा व पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

गोवा-सिंधुदुर्ग सीमा सील केल्याची चर्चा आहे मात्र ‘ब्रेकिंग मालवणी’च्या प्रतिनिधीने गोवा सीमेवरील दोन्ही तपासणी नाक्यावर जाऊन प्रत्यक्ष विचारणा केली असता सीमा सील केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतुक थांबविण्यात आली नाही. मात्र तपासणी नाक्यांवर वाहनचालकांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संबंधित मॅसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

2

4