दहा रूपये मास्क,तर शंभर रूपये सॅनिटायझर…

2

केंद्राकडून किंमत निश्चित; मेडीकल व्यावसायिकांना आवाहन…

मुंबई ता.२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर आणि मास्कची किंमत निश्चित करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फसवणूकीला आळा बसण्याची शक्यता आहे.यात शंभर रुपयापेक्षा जास्त कीमतीने सॅनिटायझर तर दहा रुपयापेक्षा जास्त मास्क विकू नये,अशा सक्त सूचना मेडिकल चालकांना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

0

4