Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या....अन्यथा आत्मक्लेश आंदोलन करू...

….अन्यथा आत्मक्लेश आंदोलन करू…

निगुडे सरपंचांचा इशारा; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खाणी विरोधातील उपोषण स्थगित…

बांदा ता.२१: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तहसिलदारांनी केलेल्या आवाहनानंतर निगुडे सरपंच समिर गावडे यांनी सोनुर्ली-वेत्ये परिसरातील खाणीच्या विरोधात पुकारलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.परंतू याबाबत १५ एप्रिल पर्यत योग्य तो निर्णय न झाल्यास नंतर आत्मक्शेल आंदोलन करू,असा इशारा त्यांनी दिला आहे.
श्री.गावडे यांनी खाणीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सावंतवाडी तहसिलदारांनी गावडे यांन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.तसेच संबधित नुकसान झालेल्या घर मालकांना,शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू,त्यासाठी आवश्यक असलेली प्रकीया पुर्ण केली जाईल,असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.त्यानुसार त्यांनी आपल्या आंदोलनाचा निर्णय मागे घेतला आहे.मात्र याबाबत १५ एप्रिल पर्यत सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन केले जाईल,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments