आठवडा बाजार भरवणाऱ्या ९ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल…

2

सिंधुदुर्गनगरी.ता,२१:  कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये आठवडा बाजार न भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने परुळे गावामध्ये शुक्रवार दिनांक २० मार्च २०२० रोजी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे दिनांक १८ मार्च २०२० रोजी गावातील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले होते. तरीही या आदेशाचा भंग करत ९ व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार भरवला होता. त्यामध्ये शेळप येथील एक, परुळे येथील चार वालावल येथील तीन आणि कुडाळ येथील एका व्यापाराचा समावेश होता. अशा प्रकारे आठवडी बाजार भरवल्यास लोकांच्या सुरक्षीततसे धोका पोहचेल व कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे याची कल्पना असतानाही बेकायदेशीर पणे व निष्काळजीपणे आठवडा बाजार भरवून लोकांची गर्दी केल्या प्रकरणी परुळे ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या ९ व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वेंगुर्ला तहलसिदार यांनी कळविले आहे.

4

4