सीसीटिव्हीतील स्पिकरच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृती….

2

पोलिस अधिक्षकांचे आश्वासनःमनसेच्या जिल्हाध्यक्षांच्या मागणीनंतर पोलिसांचा निर्णय…

कुडाळ.ता,२१: जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून शहराशहरात उभारण्यात आलेल्या सिसिटिव्ही यंत्रणेच्या स्पिकरच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.याबाबत तात्काळ दखल घेवून तशाप्रकारचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी दिले असल्याचे श्री परब यांनी सांगितले.दरम्यान आज मनसेच्यावतीने कुडाळ परिसरात मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी अनेक नागरिकांनी या मास्कचा लाभ घेतला.

सतत लोकसंपर्क असणारे एसटी कर्मचारी व रिक्षा चालक बांधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य परिवहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून मास्क चे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन सेना राज्य उपाध्यक्ष श्री बनी नाडकर्णी यांच्या सौजन्याने कुडाळ आगारातील अधिकारी कर्मचारी आणि रेल्वे स्थानक व जिजामाता चौक परिसरातील चालकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोरोना विषाण प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक “मास्क” चे वाटप करण्यात आले.यावेळी बनी नाडकर्णी यांचे समवेत जिल्हाध्यक्ष धीरज परब,कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किणळेेकर,कुडाळ सचिव राजेश टंगसाळी,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे,विभाग अध्यक्ष सुंदर गावडे व रामा सावंत,गुरू मर्गज,हितेंद्र काळशेकर आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

1

4