कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वेंगुर्ला शिवसेनेचा पुढाकार…

2

वेंगुर्ला बाजारपेठेत नागरिकांना केले मोफत मास्क वाटप…

वेंगुर्ला : ता.२१: कोरोना विषाणूने जगात थैमान घातल्यानंतर आता हा विषाणू भारतात तसेच राज्यात दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना वेंगुर्ला शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या माध्यमातून शहरात मोफत मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, जिल्हा संघटक सचिन वालावलकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, डेलिन डिसोजा, हेमंत मलबारी, संदीप केळजी, आनंद बटा, गजानन गोलतकर, दिलीप राणे, सुयोग चेंदवणकर आदी उपस्थित होते.

4

4