Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात हँडवॉश बेसिन, आपत्कालीन कक्ष कार्यान्वित...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात हँडवॉश बेसिन, आपत्कालीन कक्ष कार्यान्वित…

नगराध्यक्ष कांदळगावकर यांची माहिती ; जनता कर्फ्यु काळात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन…

मालवण, ता. २१ : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मालवण पालिकेच्यावतीने शहरात चार ठिकाणी हँडवॉश बेसिन (हात स्वच्छता पात्र) उभारणी केली जात आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी धूर व औषध फवारणीही सुरू आहे. पालिकेत आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
दरम्यान नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोठेही गर्दी करू नये. नागरिकांना आवश्यक असणारे घरपत्रक व अन्य दाखले यांची मागणी दूरध्वनी द्वारे केल्यास दाखले घरपोच देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत ‘जनता कर्फ्यु’ आवाहन केले आहे. या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नका. जनतेने सहकार्य करावे. शासन आदेश व सूचनांचे पालन करावे. तसेच आपल्या घरी पुणे, मुंबई अथवा अन्य ठिकाणाहून कोणी नातेवाईक आले असतील तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी ०२३६५२५२०३०, १८००२३३४३८१ टोल फ्री येथे संपर्क साधावा.
मालवण पालिका कार्यालयाबाहेर, बसस्थानक, फिश मार्केट व पिंपळपार या चार ठिकाणी पालिकेच्यावतीने हँडवॉश बेसिन उभारण्यात येत असल्याची माहितीही श्री. कांदळगावकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments