बांदा बसस्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छतेच्या गर्तेत…

2

भाजपा आक्रमक;एसटी प्रशासनाविरोधात नाराजी स्थानक प्रमुखांना विचारला जाब….

बांदा.ता,२१:  बांदा बस स्थानकातील स्वच्छतागृह व शौचालयात अस्वच्छतेमुळे पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बांदा शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज बसस्थानकावर धडक देत स्थानकप्रमुखाना जाब विचारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात साफसफाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. स्थानकातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून विहिरीतील पाणी अस्वच्छ असल्याने एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीविताशी खेळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष राजा सावंत, सिद्धेश पावसकर, बाळू सावंत, निलेश सावंत, बाबा काणेकर, हेमंत दाभोलकर, प्रवीण नाटेकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

0

4