कोकण रेल्वे मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या रद्द….

2

कणकवली,ता.21: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या सर्व पॅसेंजर गाड्या रविवारी (ता. 22) रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केल्याने या गाड्या तूर्तास एक दिवसासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणारी रत्नागिरी ते दादर, दादर ते रत्नागिरी, रत्नागिरी ते मडगाव, मडगाव ते रत्नागिरी, मडगाव ते सावंतवाडी, सावंतवाडी ते दिवा, कारवार ते पेडणे, पेडणे ते कारवार आणि वास्को-द-गामा ते यशवंतपूर या गाड्या उद्यासाठी रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

9

4