कणकवलीत बाजारपेठ, रस्ता ओस जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद…

2

कणकवली, ता.२२: करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला कणकवलीत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व रस्त्यांवर, बाजारपेठेत आणि बसस्थानकात शुकशुकाट आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे. रिक्षा व इतर खासगी वाहने बंद असल्याने रेल्वेतून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. मात्र एस टी प्रशासनाने 6 बसेस सोडून प्रवाशांना बसस्थानकात आणले.

1

4