टाळ्या, घंटा नाद करून वेंगुर्लेवासीयांकडून कृतन्यता…

2

वेंगुर्ले.ता,२२:  कोरोनाला रोखण्यासाठी आज “जनता कर्फ्यु” या देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला वेंगुर्लेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान सायंकाळी ५ वाजता सर्वांनी टाळ्या वाजवून, घंटा वाजवून, ढोल वाजून या मोहिमेत काम कारणाऱ्यांप्रति कृतन्यता व्यक्त केली.
दिवसभर सर्वजण घरी असल्याने आज सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. दरम्यान नागरिकांनी टाळ्या,ताट, शंख, टाळ वाजवून देशाप्रती कृतघ्नता केली व्यक्त. कोरोना घालवण्यासाठी भारतीय सज्ज झाले आहेत. सर्व भारतीय बांधवाकडून आज एकात्मिकतेचे दर्शन घडले. रुग्णालय, पोलीस, कर्मचारी अहोरात्र काम करणाऱ्यांना वेंगुर्ले वासीयांनी सलाम केला आहे.

5

4