जनता कर्फ्यूची रात्र सावंतवाडीत पोलिसांकडून “स्ट्रीक”…

2

अनेकांना दणका; नाक्या-नाक्यावर पोलिसांकडून तपासणी…

सावंतवाडी ता.२२: जनता कर्फ्यूच्या सायंकाळी आज सावंतवाडी पोलिसांनी शहरात जोरदार नाकाबंदी केली.यावेळी बिनदिक्कत तसेच उगाच फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी दणका दिला.तर काहींची उलटतपासणी घेतली.
पोलीस निरीक्षक शशिकांत खोत व त्यांचे सहकारी शहरातील गस्त घालत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण देशभरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात आला.मात्र शहरात काही नागरिक फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर पोलीस निरीक्षक खोत यांनी शहरात संपूर्ण नाकाबंदी केली.बिनदिक्कत फिरणाऱ्या युवकांना पोलिसांनी दणका दिला.दरम्यान नाक्या-नाक्यावर ही तपासणी सुरू होती.

4

4