जीवनावश्यक आस्थापने वगळता अन्य सर्व आस्थापने पुढील आदेश येई पर्यंत बंद…

2

वैभव साबळे; कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन…

वेंगुर्ले,ता.२२:  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यु मध्ये दिलेल्या साथीबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी वेंगुर्लेवासीयांचे आभार मानले आहेत. मात्र त्याच बरोबर शासनाने उध्यापासून आणखी काही निर्णय घेतले आहेत. जीवनावश्यक आस्थापने वगळता अन्य सर्व आस्थापने पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवायची आहेत. त्यालाही सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन श्री. साबळे यांनी केले आहे.
उद्या करिता शासनाकडून काही निर्देश प्राप्त झाले आहेत. यामध्ये हॉटेल्स, खानावळी यांना केवळ पार्सल सुविधा देण्याची अनुमती दिलेली आहे. हॉटेल मध्ये बसून नाश्ता किंवा जेवण उपलब्ध करून देता येणार नाही.
तसेच सर्व पान टपऱ्या, खाद्यपदार्थांचे गाडे हेही बंद करावयाचे आहेत.
बाजारामध्ये भाजीपाला, फळ, मासे, चिकन/मटण,दूध, दवाखाने, हॉस्पिटल, मेडिकल, पेट्रोल पंप, बँक, किराणा मालाची दुकाने, गॅस एजन्सी तसेच केवळ शासकीय कामे करण्यासाठी (जनतेच्या भेटीसाठी बंद) सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये (तक्रारी, चौकशी इ.) करिता केवळ फोन आणि ई मेल द्वारे उपलब्ध असतील.
आपल्या देशावर आलेले हे कोरोना व्हायरसचे संकट टाळण्यासाठी आपल्याला गर्दी पासून जास्तीत जास्त लांब राहायचे आहे. आवश्यक असेल तरच कामापूरते बाहेर पडा. आणि स्वतः बरोबर आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घ्या. प्रशासन व सर्व यंत्रणा आपल्या सोबत आहे. त्या मुळे सर्वांनी एकामेकाला सहकार्य करून या संकटातून बाहेर पडुया,आपले सहकार्य असेच मिळावे असे आवाहन श्री. साबळे यांनी केले आहे.

4

4