दारू व्यावसायिकांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांवर सु-याने हल्ला…

2

इन्सुली तपासणी नाक्यावरील घटना; सावंतवाडीतील तिघांना अटक,एक जखमी…

बांदा ता.२३: दारू वाहतूक करणाऱ्या तिघा संशयितांना पकडून गाडी जप्त केल्याच्या रागातून चक्क राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यावर सुर्‍याने हल्ला केल्याचा प्रकार इन्सुली बांदा येथील तपासणी नाक्यावर घडला.यात एक शासकीय कर्मचारी जखमी झाला आहे.रमेश चंदुरे असे त्याचे नाव आहे.ही घटना काल सायंकाळी इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील नाक्यावर घडली.याप्रकरणी सावंतवाडी माजगाव येथील तिघांवर हल्ला करुन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन प्रकाश सूर्यवंशी रा. माजगाव तांबळगोठण, रामजी विनायक देसाई रा.कुंभारवाडा व बाळा राठवड रा. कासारवाडा अशी या संशयातांची नावे आहेत.जप्त केलेली दारूची गाडी कार्यालयाच्या मागे का लावली नाही या वादातून हा प्रकार घडला.यातून सूर्यवंशी याने आपल्या हातात असलेल्या सुर्‍याने वार केले यात चंदुरी हा जखमी झाला.अशी प्रतिक्रिया तेथील कर्मचारी शैलेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

6

4