गोव्याच्या सिमा आज सकाळपासून “सील”…

2

कडेकोट बंदोबस्त;अत्यावश्यक सेवा वगळून, बाकीच्यांना “नो एंट्री”

बांदा,ता.२३:  गोवा शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या “जनता कर्फ्यु”च्या पार्श्वभूमिवर आज पासून गोव्याच्या सिमा सर्वसामान्यांसाठी काल रात्री बारा नंतर बंद करण्यात आल्या,मात्र अत्यावश्यक सेवा रुग्णवाहीका अशा सेवा सुरू होत्या.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी सिमा तपासणी नाक्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अचानक अशा पध्दतीने “नो एन्ट्री” घोषित करण्यात आल्यामुळे,सकाळच्यावेळी गोव्यात कामासाठी जाणार्‍या सिंधूदुर्ग जिल्ह्यातील युवकांना माघारी फिरावे लागले.दरम्यान ही बंद आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे.त्यामुळे गोव्याकडे येणारे सर्व तपासणी नाके अशाच पध्दतीने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे,असे आवाहन गोव्याच्या पोलिस प्रमुखांच्यावतीने करण्यात आले.

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनता कर्फ्यु तीन दिवस जाहीर केला आहे. त्यामुळे गोव्यातील सर्व व्यवहार तीन दिवस बंद राहणार आहेत. राज्यात महाराष्ट्रातून येणारी वाहने रोखण्यासाठी गोवा शासनाने सीमेवर पत्रादेवी येथे तपासणी नाका उभारला आहे. येथे गोव्याची सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा परिसरातील ६० टक्के युवक हे गोव्यात नोकरीनिमित्त दररोज प्रवास करतात. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना देखील गोव्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गोव्यात जाणारी बससेवा, खासगी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग सीमेवर पत्रादेवी, न्हयबाग येथे गोवा पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.

2

4